मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता

1 min read

जुन्नर दि.७:- शरद पवारांनी आता जुन्नरमध्ये अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात निष्ठावंत चेहरा मोहित ढमाले मैदानात उतरवणार असल्याची चर्चा असून ढमाले यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. जुन्नर तालुक्यात लोकसभेला शरद पवार राष्ट्रवादी गटला मताधिक्य मिळाले आहे. अतुल बेनकें विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्याला मैदानात उतरवण्याची शक्यता शरद पवारांनी नवी खेळी केली तर जुन्नरच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी शरद पवार नव्या शिलेदाराला मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मोहित ढमाले २०१७ ते २०२२ या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर मोहित ढमालेंनी शरद पवार यांना साथ दिली होती. शरद पवारांची साथ ठामपणे दिली होती. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते. मोहित ढमाले पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी यांनी केली आहे. विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार हे मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणून मोहित ढमाले यांनी ओळखले जाते. सोमवार दि.७ रोजी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना घेरण्यासाठी शरद पवारांच्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा आत्मविश्वास देखील द्विगुणित झाल्याचे बोलले जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे