सत्यशील शेरकर यांनी आजच्या शरद पवार भेटीचे कारण केले स्पष्ट

1 min read

जुन्नर दि.९:- माजी कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची जुन्नर तालुक्यातील वाढत्या बिबट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आज बुधवार दि.९ रोजी भेट घेतली.

मात्र शोषल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठू लागल्या. मात्र आजची भेट ही फक्त बिबट प्रश्नी उपाययोजनांबाबत होती. असे शेरकर यांनी स्पष्ट केले आहे.

शेरकर परिवाराचा पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी सातत्याने राजकारण व समाजकारण करत आलो आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी यावेळी माझे नाव चर्चेत असले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यास मी कटिबद्ध आहे, एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो.असे ही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे