विधानसभेचा धुरळा; आज आचार संहिता लागण्याची शक्यता; दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद

1 min read

मुंबई दि.१५:- महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार आहे. आज दुपारी निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक किती टप्प्यात होणार आणि कोणती तयारी सुरू आहे हे निवडणूक आयोग सांगेल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्याचबरोबर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे.महाराष्ट्र येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच लढत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना युबीटी आहे. त्याचबरोबर महाआघाडीत भाजप, शिवसेनेतील शिंदे गट आणि अजित पवारांसह राष्ट्रवादीचा गट आहे. येथे दोन्ही आघाड्या जागावाटप अंतिम करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे