माजी खासदार आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेत परतणार? आजच्या अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ 

1 min read

मंचर दि.१२:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे शिरूर लोकसभेचे माजी खासदार आढळराव पाटील अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत असल्याने ते पुन्हा शिवसेनावासी होण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

या चर्चा रंगण्याच कारण की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार दि.१२ रोजी आळंदी, खेड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला.

या मेळाव्याला मात्र माजी खासदार आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील मात्र अनुपस्थित होते. त्यांची ही अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा व आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते.

लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधतायेत. त्यामुळंच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते.

या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता ही वर्तवली जात असून चर्चांना उधाण आलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे