मंगरूळ येथे निर्भया पथकाडून विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे
1 min read
मंगरूळ दि.२०:- ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ (ता.जुन्नर) या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या सौजन्याने विद्यालयातील मुलींसाठी मोफत कराटे क्लास चे उदघाटन करण्यात आले . सध्याची परिस्थिती पाहता मुलींच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. त्याच हेतूने शाळेत कराटे क्लासेस सुरू करत असल्याचे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच स्व-संरक्षणाची अधिकची माहिती मुलींना मिळावी, तसेच आधार मिळावा यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशन च्या निर्भया पथकाला बोलावण्यात आले होते.
याप्रसंगी आळेफाटा पोलीस स्टेशन निर्भया पथकच्या प्रमुख ज्योती दहीफळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी, समस्या लक्षात घेऊन त्यावरील उपायांची माहिती त्यांनी दिली. या याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. आळेफाटा पोलीस हवालदार सचिन रहाणे, कराटे शिक्षिका काजल गाजरे, विजय डुकरे, रमेश जाधव, अंजली बांगर, मंगरूळ गावच्या लोकनियुक्त सरपंच तारा लामखडे, शालेय समिती सदस्य गोरक्ष लामखडे, प्रांजल जाधव, योगिता फकटकर.
सुरेखा लामखडे, सविता घोलप, शिवाजी खिल्लारी, तानाजी खराडे, रोहित बनसोडे व विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी खिलारी यांनी केले.