राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 min read

मुंबई दि १९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ (SHS) अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा गिरगाव चौपाटी येथून शुभारंभ झाला. महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडे, सेना दलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईत डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदूषण खूप कमी झाले आहे. याकामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे.
हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती पर्यंत चालणार असून याअंतर्गत राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायली हवी. आरआरआर (रेड्युस,रियूज,रिसायकल) केंद्र उभारून पर्यटनस्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण व सौंदर्यीकरण सुरू आहे. नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधली असून, त्यासाठी त्रिसूत्री नियोजन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे