केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘लालबाग चा राजा’ चरणी
1 min read
मुंबई दि.९:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवार दि.९ रोजी लालबाग राजा गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी लालबाग राजा गणेशोत्सव ट्रस्टच्यावतीने श्रीगणेश प्रतिमा देऊन अमित शहा यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.