सातबारा उताऱ्यावरही लागणार आता आईचे नाव; १ नाेव्हेंबरपासून अंमलबजावणी
1 min read
मुंबई दि.२०:- सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव देखील लावण्यात येणार आहे, सरकारने हा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.भूमी अभिलेख विभागाच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्रात १ मे २०२४ नंतर ज्यांचा जन्म झाला असेल, त्यांच्या नावावर जमीन खरेदी करताना संबंधिताच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणे बंधनकारक आहे.
जमीन व्यवहारात पुढील काळात फेरफार करण्यात आल्यास त्यावरदेखील आईचे नाव लावले जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर यातील त्रुटीला अभ्यास करत त्यावरुन उपाययोजना करण्यात येतील. नंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.