डिसेंट फाउंडेशन च्या नेत्र तपासणी शिबिरात १७२ जणांची तपासणी
1 min readआळे दि.१७:-आळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे, संतवाडी, कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १७२ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४२ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा महिन्यात साठ शिबिरे संपन्न झाली असून दोन हजार पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पणे पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांना त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही.
रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणारा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले. याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, विवेक काकडे, ऋषीकेश कुऱ्हाडे, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके, उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी, सखाराम कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे, किसन बहिरट, हिरोजी कुऱ्हाडे, पांडुरंग गाढवे, मंगल कुऱ्हाडे,योगेश वाघचौरे, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.