आणे घाटातील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढली

1 min read

आणे दि.१२:- कल्याण-नगर हायवेवर आळेफाटा पासून सुमारे विस किलोमिटर अंतरावर आणे आणि गुळूंचवाडीच्या मध्यांतरावर नागमोड्या वळणांचा दोन किलोमिटर अंतराचा घाट लागतो.त्या घाटातच मनमोहक असा नैसर्गिक पाण्याचा धबधबा आहे.

रस्त्याच्या लगतच धबधबा असल्यामुळे साहजिकच तो धबधबा गाडीतूनच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे मन मोहून घेताना निदर्शनास येत आहे.येथे मोठ्या प्रमाणात गाड्या थांबून लोक नैसर्गिक चिंब भिजण्याचा आनंद लुटताना दिसतात. याच धबधब्याच्या खाली थोड्याच अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात सुप्रसिद्ध असलेला. भारतातील सर्वात मोठा नैसर्गिक शिलासेतू आहे आणि या सिलासेतूच्या समोरच गुळुंचवाडी येथील श्रध्दास्थान असलेल्या माता मळगंगा देवीचे मूळ ठाण मंदिर आहे. साहजिकच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी थांबलेले पर्यटक वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दोन डोंगरांच्या खोल दरीत उतरून जाऊन. नैसर्गिक शीलासेतू आणि मळगंगा मातेचे दर्शन घेऊनच परतीच्या वाटेवर प्रवास करतात. निसर्गरम्य वातावरण व सोबत पाण्याच्या धबधब्याचा खळखळ आवाज याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.कल्याण-नगर महामार्गावर आणे घाटात उतरून देवीकडे जाण्यासाठी पायऱ्या व पाऊलवाट आहेत. खाली गेल्यानंतर खडकातून वाहत येणार तेथिलही धबधबा पर्यटकांना आकर्षित करून घेतात. निसर्गरम्य वातावरण त्यात गर्द झाडी आपणाला मोहून घेतल्या शिवाय राहत नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने धबधब्याला सध्या पाणी आलं आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे