ज्ञानराज पतसंस्थेकडून १२% टक्के लाभांश जाहीर; संस्थेला २७ लाख रुपये नफा
1 min read
आळे दि.११:- आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १२ टक्के लाभांश व दीपावली भेट वस्तु देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.ज्ञानराज पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक रामदास वाव्हळ, संस्थेचे माजी अध्यक्ष नेताजी डोके, संख्येचे उपाध्यक्ष समीर टकले, माजी उपाध्यक्ष प्रितम काळे, सह. सेक्रेटरी गणेश शिंदे, खजिनदार राजेंद्र वनारसे, संतोष राहिंज, विठ्ठल जाधव, समीर आतार, अमित राहिंज, इम्रान मनियार, सचिन लाड, संचालिका सुप्रिया शिरतर, सुनिता भालेराव व्यवस्थापक लक्ष्मण औटी आदी उपस्थित होते.
या संस्थेच्या ठेवी २७ कोटी आहेत. तर गुंतवणूक १२ कोटी व खेळते भागभांडवल ३४ कोटी आहे. संस्थेमध्ये वीज बिल स्विकृती केंद्र, सोनेतारण कर्ज सुविधां, सभासदांचा अपघात विमा १ लाख रुपयांचा आहे. तर नफा २७ लाख झाला आहे. प्रास्तविक इम्रान मनियार यांनी केले. तर सभेचे सुत्रसंचालन व आभार व्यवस्थापक लक्ष्मण औटी यांनी मानले.