बाभळेश्वर – कडुस विद्युत वाहिनीच्या ४०० K.V अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

1 min read

आळेफाटा दि.१०:- बाभळेश्वर – कडुस(मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही.अति.उच्च वाहिणीच्या टॉवरच्या बांधकामाचे काम शेतक-यांनी सोमवार दि.९ रोजी बंद पाडले. बाभळेश्वर ते मुंबईकडे जाणारी लाईन उभारून पुर्ण झाली आहे. केवळ आळे (ता.जुन्नर) गावात काम शेतकऱ्यांनी बंद पाडले.

गेल्या १० वर्षांपासुन हे प्रकरण न्यायालयात आहे. सदर प्रकरणी कोर्टात शेतकरी दाद मागत आहेत.जमिनींचे वेळोवेळी होणारे भूसंपादनास शेतकरी कंटाळला आहे. पिंपळगाव जोगा पाटपाण्याचे कालवे, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे संपादन, रस्ते महामार्ग रूंदीकरण यासाठी संपादन वेळोवेळी होत आहे.

त्यात टाँवर लाईनचे भूसंपादन न परवडणारे आहे. तरी याबाबत शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहे. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपा नेत्या आशा बुचके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, मोहित ढमाले, तुषार थोरात.

अनंतराव चौगुले पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, दिनेश सहाणे, किशोर कु-हाडे, गणेश गुंजाळ, गणेश शिंदे, निलेश शिंदे, मिननाथ शिंदे, अरुण हुलवळे, सुंदर क-हाडे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

जवळपास २९ शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारे हे हाय व्हॉलटेज लाईनचे भूसंपादन शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीव मोबदला जरी मिळाला तरी माघार घेणार नाही, भूसंपादन होऊ देणार नाही असा संतप्त पीडित शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला.

यावेळी महापारेषणतर्फे उच्च पदस्थ इंजिनिअर्स, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार सुनिल शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, आळेफाटा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे उपस्थित होते. शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता गणेश उत्सव.

सपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित पीडित शेतकरी, महापारेषण अधिकारी यांची समनव्यक बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात आले. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा आळेफाटा या ठिकाणी आणला होता.


प्रतिक्रिया -“बाभळेश्वर- कडुस (मुंबई) हि विद्युत वाहिनी आळे गावातुन जात असल्याने येथील शेतक-यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता अश्या प्रकारे कारवाई करत असेल ती अन्यायकारक असुन व लवकरच शेतकरी, आळे, कोळवा‌डी ,संतवाडी गावचे सरपंच यांच्या उपस्थित संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे व या विद्युत वाहिनीला शेतक-यांचा विरोध असल्याने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.”

अतुल बेनके, आमदार, जुन्नर


प्रतिक्रिया -” बाभळेश्वर – कडुस या विद्युत वाहिनी ला आळे येथील शेतक-यानी विरोध दर्शविला आहे ते या भुमिकेवर ठाम असुन आयोजीत केलेल्या बैठकीत त्यांना त्यांचे विषय मांडता येईल.”

गोविंद शिंदे प्रांताधिकारी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे