अतिरिक्त जिल्हा व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना करण्याची मागणी;आमदार अतुल बेनके यांनी घेतली अजित पवार यांची भेट
1 min read
जुन्नर दि.१०:- जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.पुणे (सर्किट हाऊस) येथे आमदार बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची भेट घेतली.

जुन्नर तालुक्याची भौगोलिक परस्थिती लक्षात घेता तसेच वाढत्या केसेसची संख्या लक्षात घेता व तालुक्यातील पक्षकारांचा विचार करता सदरचे न्यायालय हे स्थापन होणे गरजेचे आहे अशी मागणी जुन्नर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जुन्नर बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. हेमंत किसनराव भास्कर उपाध्यक्ष ॲड. समिर बाळासाहेब पुरवंत, उपाध्यक्ष ॲड. हेमंत यशवंत हाडवळे, सेक्रेटरी ॲड. आशिष नारायण वानखेडे, ग्रंथपाल ॲड. समकित सुनील नानावटी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.