आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते राजुरी १ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

1 min read

राजुरी दि.८:- जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे १ कोटी ८५ लक्ष रु. च्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

या दरम्यान आमदार बेनके यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळ या मंडळास भेट देऊन श्रीं चे दर्शन घेतले आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खालील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. राजुरी दावलमलिक बाबा लवणमळा १४ रत्न रस्ता तयार करणे. – ३० लक्ष रू., राजुरी आवटेवाडी भैरवनाथ मंदिर सामाजिक सभागृह बांधणे. – ३० लक्ष रू.

राजुरी स्मशानभूमी लगत (बस स्थानक) सौरक्षक भिंत बांधणे. – २० लक्ष रु.,राजुरी हातवळण लक्ष्मणबाबा सामाजिक सभागृह बांधणे. – १५ लक्ष रु.,राजुरी हिवरमळा येथे सामाजिक सभागृह बांधणे. – १० लक्ष रु.

राजुरी पंचरंगी गटकळ मळा येथे सामजिक सभागृह बांधणे. – १० लक्ष रु.,राजुरी आबाटेक रोड ते गटकळमळा रस्ता तयार करणे. – १० लक्ष रु.,राजुरी दावलमलिक बाबा रोड ते लवणमळा अंतर्गत रस्ता तयार करणे. – १० लक्ष रू.

राजुरी जुंदरेमळा कॅनॉल ते मुक्तामाता मंदिर फावडेमळा रस्ता तयार करणे. – १० लक्ष रु., राजुरी इंदिरानगर अंतर्गत रस्ता करणे पेव्हर ब्लॉक बसविणे. – १० लक्ष रु., राजुरी इंदिरानगर रस्ता काँक्रीटीकरण करणे. – १० लक्ष रु.

राजुरी हरिजनवस्ती येथे रस्ता काँक्रीटकरण करणे. – १० लक्ष रू.,राजुरी शिंदेमळा येथे सामाजिक सभागृह बांधणे. – १० लक्ष रु. या वेळी आमदार अतुल बेनके बोलताना म्हणाले की, विकासाच्या कामांच्या बाबत राजुरी गाव हे नेहमी अग्रेसर असते.

या आधीही राजुरी गाव आणि परिसर विकासासाठी विविध विभागांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या पुढेही प्रगतीची हि गंगा दारोदारी अशीच वाहती राहील.

यावेळी दीपक औटी, जयसिंग औटी, गावच्या सरपंच, उपसरपंच माऊली शेळके, ग्रामपंचायत सदस्य आणि राजुरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे