शादावल दावल मलिक बाबाचा उरूस व श्री बाळेश्वर देवाच्या यात्रोत्सव उत्साहात साजरा

1 min read

गुंजाळवाडी दि.७:- हिंदू-मुस्लिम भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाऱ्या शादावल दावल मलिक बाबाचा उरूस आणि श्री बाळेश्वर देवाच्या यात्रोत्सवामुळे गुरुवारी (५ सप्टेंबर) बेल्हे गावाजवळच्या बांगरवाडी-गुंजाळवाडी डोंगराचा दोन्ही बाजूचा परिसर गर्दीने खुलून गेला होता.

दर वर्षीप्रमाणे गुंजाळवाडी ग्रामस्थ यावर्षीही गडाऐवजी डोंगराच्या पायथ्याशी दावलशी बाबाचा उरूस साजरा करीत आहेत. दावल मलीक डोंगरावर दर्गा, बाळेश्वर मंदिर व पायथ्याशी या यात्रेनिमित्त दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

श्रावणात पाचव्या गुरुवारला होणाऱ्या दावलमालिक बाबांच्या उरूस निमित्त दर्याला आणि यात्रेनिमित्त बाळेश्वर मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली होती. बेल्हे परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह भाविकांनी ही आवर्जून हजेरी लावली. परिसरातील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने दर्गा आणि मंदिरात नवस करून काही जण नवसपूर्ती करीत असल्याने यंदाही गर्दी झाली होती.

तसेच गुंजाळवाडी गावच्या श्री मुक्ताबाई देवी व दावलशी बाबा यात्रोत्सवा निमित्ताने तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी भेट देऊन ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. बोलताना आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध यात्रा उत्सवांपैकी हि एक यात्रा आहे.

गुंजाळवाडी गावाने बेनके कुटुंबासोबत कायम प्रेमाचा ऋणानुबंध जपला आहे. यात्रेच्या निमित्ताने श्री मुक्ताबाई देवी चे दर्शन घेऊन तसेच ग्रामस्थांशी, युवक, युवतींशी आणि महिलांशी आपुलकीने संवाद साधून प्रसन्न वाटले.

यावेळी नयना गुंजाळ (सरपंच), संगीता बोरचटे (उपसरपंच), संजय बोरचटे, निलेश बोरचटे, अतुल भांबेरे, गोविद बोरचटे, राजु पिंगट (उपसरपंच बेल्हे), किसन बोरचटे, बाबू बोरचटे, गोटयाभाऊ वाघ, भाऊ गुंजाळ, समीर गायकवाड, नजीम बेपारी, किसन गुंजाळ गोरक्ष गुंजाळ, राहुल बोरचटे,

रामा गुंजाळ, भागचंद बोरचटे, आकाश गुंजाळ, मयुर तांबे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.तसेच बांगरवाडी गावातील जालिंदर बांगर, प्रमोद बांगर, गजानन फराटे, मोहन बांगर यांसह बांगरवाडी तील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे