श्री साईकृपा पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ८ टक्के लाभांश तर संस्थेला ७१ लाखांचा नफा

1 min read

बेल्हे दि.८:- श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्हे (ता. जुन्नर) ची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक सूर्यकांत गुंजाळ यांनी केले.

संस्थेचे वर्ष अखेर सभासद संख्या ५ हजार ९८९ तर ठेवी ४८ कोटी रुपयांच्या आहेत. ३७ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून संस्थेचा वार्षिक नफा ७१ लाख २ हजार रुपये असून सभासदांना ८ टक्के लाभांश व दीपावली शुभेच्छा भेट वस्तू देण्याचे मंजूर करण्यात आले.

सभेपूर्वी सभासदांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या वतीने सभासदांचे हक्क, कर्तव्य, जबाबदारी व बदललेल्या सहकाराचे धोरण यावर प्रशिक्षण देण्यात आले. सभेची सुरुवात श्री गणेश पूजनाने व श्री साईबाबांच्या आरतीने झाली.

सुत्रसंचालन सावकार पिंगट यांनी केले तर अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव यांनी केले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत जगताप,

उपाध्यक्ष सदाशिव बोरचटे, सचिव सावकार पिंगट, खजिनदार संजय विश्वासराव,टी.एल गुंजाळ, बसुराज कोळी, केशव काळे, पाराजी बोरचटे,

सतीश शिरोळे, प्रभाकर बनकर, दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब दाते, संभाजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, बाळकृष्ण शिरतर, अतुल थोरात, तुकाराम चव्हाण, संतोष शिंदे, शंकर विश्वासराव, बबनराव हाडवळे, सखाराम गोर्डे हरिदास ताजवे, ऋतुजा माळवदकर तसेच सर्व संचालक मंडळ,कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे