बाळासाहेब जाधव महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

1 min read

आळे दि.६:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शास्त्र शाखेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आदित्य ढेरंगे, चैतन्य फरतरे, धनश्री कुटे, स्नेहल कुरकुटे, या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. राधाकिसन तागड , डॉ.जयसिंग गाडेकर व प्राचार्य डॉ.प्रविण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे शिक्षक दिन साजरी केल्याबद्दल कौतुक व आभार मानले.

या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे
अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे तसेच संचालक किशोर कु-हाडे, भाउ कु-हाडे, बबन सहाणे. उल्हास सहाणे,बाबु कुऱ्हाडे,शिवाजी गुंजाळ,जीवन शिंदे,दिनेश सहाणे,कैलास शेळके,प्रदिप गुंजाळ,देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे