बेल्हे जिल्हा परिषद शाळेला शिक्षक दिनी शर्मा कुटुंबियांकडून डायस भेट 

1 min read

बेल्हे दि.६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत शिक्षकदिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने भाषणे करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगत शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोबत श्री चक्रधर स्वामींची जयंतीही शाळेत साजरी करण्यात आली.

शालेय व्यवस्थापन समितीचे समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर सदस्या वैशाली मटाले, मनीषा बांगर, दादाभाऊ मुलमुले, प्रितम मुंजाळ यांनी उपस्थित राहून केक कापून शिक्षक दिन शिक्षकांसोबत साजरा केला व सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

शाळेमध्ये सुरू असलेल्या मिशन बर्थडे उपक्रमांतर्गत शाळेला बलराज शर्मा व स्वरूपा शर्मा यांज कडून मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला डायस भेट देण्यात आला. त्यांचा यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका मिरा बेलकर व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे