व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये जुन्नर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा दिमाखात संपन्न
1 min read
नगदवाडी दि.७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित- व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूलच्या भव्यप्रांगणामध्ये सुरू असलेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. या स्पर्धांसाठी जुन्नर तालुक्यातील अनेक शाळांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दि.4 सप्टेंबर रोजी मुलांसाठी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर दि. 5 सप्टेंबर रोजी मुलींसाठी खो-खो स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील उपविजयी व विजयी झालेल्या मुले व मुलींच्या संघांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सांगता समारंभासाठी सावरगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जुन्नर विष्णू धोंडगे यांची उपस्थिती लाभली.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, विश्वस्त संपत काने, विश्वस्त विक्रांत काळे तसेच प्रफुल्ल बोरचटे, सुरेश ॵटी इ.मान्यवरही उपस्थित होते. पालक- शिक्षक संघाच्या सदस्या शुभांगी गुंजाळ व काही पालक प्रतिनिधींनीही सांगता समारंभासाठी उपस्थिती दर्शवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले.
क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व पराग छिल्लारे यांनी सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या विशेष सहकार्याने स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन पार पाडले. शाळेच्या शिक्षका मनीषा हांडे यांनी सर्व मान्यवरांचे, उपस्थितांचे आभार व्यक्त केले व स्पर्धांची सांगता झाली.