गणेश उत्सवाच्या वर्गनीला जबरदस्ती करू नका; तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो:- डीवायएसपी रविंद्र चौधर

1 min read

आळेफाटा दि.४:- गणेश उत्सवात अक्षेपार्ह देखावे साजर करू नये तसेच समाजातील धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल असा उत्सव साजरा करुन समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांनी केले.

आळेफाटा (ता.जुन्नर) येथिल पोलिस ठाण्याअंतर्गत गणपती उत्सवांच्या पार्श्वूमीवर बुधवार दि.४ रोजी सौभद्र मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, अनिल पवार आदी उपस्थित होते.चौधर पुढे म्हणाले की, मंडळांनी पारंपारिक वाद्याचा वापर करावा, मिरवणूक मागे पुढे घेण्यावरून वाढ करू नये, वर्गनीला जबरदस्ती करू नका. तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल केले जाईल, गणपती स्टेज ने वाहतुकीला अडथळा होऊ नये, विज जोड वीज कंपनीकडून घ्यावी. शक्य झाल्यास शाडूच्या मुर्ती वापरा तसेच प्लास्टिकचा वापर टाळा, ध्वनी प्रदुषण टाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करा. अनोळखी वस्तू व व्यक्ती बाबत दक्ष रहावे, आपणही सिव्हील ड्रेस मधील पोलीस आहोत. सजग राहून अनुचित प्रकार टाळा. पोलीसांच्या सुचनाचे पालन करा.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे म्हणाले सर्व मंडळांणी सार्वजनिक गणपती जवळ सी सी.टि.व्ही.कॅमेरा लावावेत तसेच चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी. सर्व गणेश मंडळांणी स्थापना मिरवणुक व विर्सजणाच्या वेळी पारंपारिक वाद्याचा वापर करणे बंधन कारक असुन सर्वांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी. कायदा सुव्यवस्था न राखल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच गणेश उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी सर्वांणी काळजी घेऊन पोलीसांणा सहकार्य करावे असे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे