आळेफाटा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी दिनेश तायडे यांची नियुक्ती
1 min read
आळेफाटा दि.४:- आळेफाटा (ता. जुन्नर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागी दिनेश तायडे यांची नियुक्ती झाली आहे.नव नियुक्त पोलिस निरीक्षक दिनेश तायडे हे २००५ साली पोलीस दलामध्ये रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सेवा केली. त्या नंतर ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपले कर्तव्य बजावले. गुन्हेगारी प्रवृत्तीला कायदेशीर पायबंदी घातली जाणार असून चोरी व महिला वरील अत्याचार खपून घेतले जाणार असून अशा व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.
तसेच सण उत्सवांच्या काळात शासकीय नियमांचे पालन न केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. त्याच बरोबर निर्भया पथक ॲक्टिवेट करून शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यावर सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक पोलिस निरीक्षक अनिल पवार,तसेच सर्व पोलिस स्टाफ ने तायडे यांचे स्वागत करून सत्कार केला.