उसाला ३२०० रूपये बाजार भाव मान्य नाही; शेतकरी संघटना करणार आंदोलन

1 min read

जुन्नर दि.२:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने प्रति टन उसाला 3200/- रूपये बाजार भाव जाहीर केला आहे. तो शेतकरी संघटनेने अजिबात मान्य नसल्याचे सांगत प्रति टन उसाला 3500/-रूपये बाजार भावावर जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटना ठाम असून. लवकरच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवृत्तीनगर,जुन्नर/ आंबेगाव च्या गेट वर तिव्र स्वरूपाचे आंदोलण तारीख निश्चित करून लवकरच करण्यात येणार आहे असल्याची माहिती शेतकरी संघटना अध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. या आंदोलनात रमेश शिंदे (सं./अध्यक्ष-सह्याद्री शेतकरी संघटना म.राज्य.प्रदेश..), राजेंद्र ढोमसे (अध्यक्ष शिवनेरी शेतकरी संघटना). प्रमोद खांडगे (अध्यक्ष शेतकरी संघटना पुणे), योगेश तोडकर (अध्यक्ष मनसे शेतकरी सेना पुणे,), नवनाथ भांबेरे (तालुका अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना),प्रवीण डोंगरे (कार्याध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना जुन्नर), भागेश्वर भुजबळ,आकाश मंडलिक, प्रकाश बनकर आदी उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे