पित्ताच्या समस्येवर सोपे घरगुती उपाय; अ‍ॅसिडिटी पासून मिळेल मुक्ती

1 min read

जुन्नर दि.३:- अ‍ॅसिडिटी सामान्य आरोग्य समस्या आहे. जी पोटातील अ‍ॅसिडसिड वाढल्यामुळे होते. या समस्येमुळे पोटात जळजळ, छातीत दुखणे, आणि तोंडात आंबटपणा येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

पित्ताची सर्वात मोठी ओळख ही छातीत जळजळ होणे आणि अंगावर लालभडक चट्टे उठणे ही असते. कधी कधी छातीच्या खालच्या भागातही प्रचंड वेदना होतात आणि मुरडा पडल्यासारखं वाटतं. यावर खाली दिलेल्या सोप्या घरगुती उपायांनीही उपचार केला जाऊ शकतात.

असे अनेक अन्नपदार्थ आहेत जे आपल्या आहारात समाविष्ट केल्यास अ‍ॅसिडिटीवर त्वरित आराम मिळू शकतो. जे अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम देऊ शकतात. पित्त वाढणे म्हणजे नेमके काय? वात, पित्त आणि कफ या तीन गोष्टींनी शरीर बनलेले आहे. यापैकी एक जरी दोष असंतुलित झाला तर गंभीर रोग उद्भवू शकतात. म्हणूनच हे तिन्ही दोष शांत आणि संतुलित करण्याचा प्रयत्न करावा. जास्त तिखट अन्नपदार्थ खाल्ल्यास पित्त दोष वाढतो किंवा स्ट्रेस वाढल्यास पित्त होते. यामुळे शरीरातील अग्नीचे किंवा उष्णतेचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे तब्बल 40 प्रकारचे रोग होतात. कोणत्याही दोषाचे प्रमाण वाढणे इतर भयंकर रोगांना आमंत्रित करते.

कशामुळे वाढते पित्त?

डॉक्टरांच्या मते, पित्त वाढण्यासाठी अन्न, शरीर आणि भावनिक घटकांचा समावेश होतो. अधिक तिखट, आंबट, मसालेदार, खारट, तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात पित्त दोष वाढतो. कॅफीनयुक्त पदार्थ, दारू आणि तंबाखू खाल्ल्याने पित्त इनबॅलन्स होते. भावनिक ताण किंवा अधिक व्यायाम केल्याने देखील पित्त वाढू शकते.

केळी

केळी हे एक सुप्रसिद्ध फळ आहे जे अ‍ॅसिडिटीवर त्वरित आराम देते. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड गुणधर्म असतात, जे पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी करतात. केळी खाल्ल्याने पोटात थंडावा येतो आणि जळजळ कमी होते. याशिवाय, केळीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधरते, ज्यामुळे अ‍ॅसिडसिडिटीचा त्रास कमी होतो. केळी सहज पचते आणि त्वरित ऊर्जा प्रदान करते, त्यामुळे केळीचे सेवन अ‍ॅसिडिटीवर एक उत्तम उपाय आहे.

आल्याचा रस

आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पोटातील अ‍ॅसिडसिडिटी कमी करण्यास मदत करतात. आल्याचा रस किंवा आले पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. आले पोटातील गॅस्ट्रिक सिक्रेशन्स कमी करते, ज्यामुळे पोटातील जळजळ आणि वेदना कमी होतात. आल्याचा वापर फक्त अ‍ॅसिडिटीवरच नाही तर इतर पचनविषयक समस्यांवरही प्रभावी ठरतो.

बदाम

बदाम हा आरोग्यासाठी लाभदायक असलेला सुकामेवा आहे, ज्यामध्ये पचनास उपयुक्त असलेले अनेक पौष्टिक घटक असतात. बदामामध्ये असलेल्या नैसर्गिक तेलांमुळे पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. बदामाचे नियमित सेवन केल्यास पोटातील जळजळ आणि अ‍ॅसिडसिडिटी कमी होते. अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी काही बदाम चघळणे हा एक सोपा उपाय आहे.

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पोटातील अ‍ॅसिडसिडचे प्रमाण कमी करते. नारळाचे पाणी पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि अ‍ॅसिडसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो. याशिवाय, नारळाच्या पाण्यातील नैसर्गिक गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यात मदत करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे