डॉ.बोऱ्हाडे हॉस्पिटल मध्ये १५५ रुग्णांनी मोफत तपासणी व औषध वाटप
1 min read
पिंपळवंडी दि.२३:- डॉ.बोऱ्हाडे हॉस्पिटल पिंपळवंडी (ता.जुन्नर) व राजस्थान औषधालय प्रा.लि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या पिंपळवंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला अशी माहिती डॉ.संकेत बोऱ्हाडे यांनी दिली. या शिबिरात सांधेदुखी, हाडांचे विकार, जुने श्वास विकार, दमा, अस्थमा या आजारांवरील १५५ रुग्णांनी लाभ घेतला. तसेच या सर्व रुग्णांना ५ दिवसाचे मोफत औषध वाटप यावेळी करण्यात आल्याची माहिती राजस्थान औषधालयाचे प्रतिनिधी विजय आवटे यांनी दिली.
यापुढेही विविध आजारांवरील शिबिरे आयोजीत करण्यात येणार असल्याचे डॉ.संकेत बोऱ्हाडे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला या शिबिराचा मोठा लाभ होत आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.