स्वतंत्र दिनापासून महेश मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी तपासणी फी व ECG मोफत
1 min readआळेफाटा दि.१४:- आळेफाटा (ता.जुन्नर) महेश मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये ७० वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या आजी बाबां कडून कोणतीही तपासणी फी घेतली जात नाही. तसेच E.C.G ही मोफत केली जाते.
सामाजिक बांधिलकी म्हणून हॉस्पिटल ने हा उपक्रम स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून हाती घेतला आहे. तसेच 15 ऑगस्ट च्या निमित्ताने Uncomplicated (किचकट नसलेल्या) शस्त्रक्रिया १) सिझर 25000 रुपये (औषधांसहित), गर्भाशय काढणे 27500 रुपये (औषधांसहित), अपेंडिक्स व हर्निया 20000 रुपये (औषधांसहित) केल्या जातील. शिवाय रक्त व लघवी तपासणी मध्ये 40% सूट दिली जाईल.
गरीब व अतिशय गरजू रुग्णांसाठी हॉस्पिटलची नेहमीच सहकार्याची भावना असते. नामांकित हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध असून यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मेडी assist insurance, Manipal Cigna हेल्थ इन्शुरन्स आदि नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
या हॉस्पिटलमध्ये जनरल विभाग, सर्जिकल विभाग, मेडिसिन, अतिदक्षता विभाग, त्वचारोग, पोटांचे विकार व शस्त्रक्रिया, मेंदू व हृदयाशी सबंधित आजारांवर उपचार आदी अद्यावत सुविधा व उपचार या हॉस्पिटलमध्ये केले जातात. तसेच स्रीरोग आजार व प्रसूती विभाग, गर्भपिशवी अंडाशयाच्या शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र, कार्डीयाक मॉनिटर, थायरॉईड व संधिवात आजार यावर उपचार केले जातात.
डॉ. संजय गाडेकर व डॉ. मनीषा संजय गाडेकर हे २४ तास रुग्ण सेवेसाठी तत्पर असतात. संपर्क:- 9552304597, 9766408510, 9766408058