साईदिप हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र दिनानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर
1 min read
निमगाव सावा दि.११:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे साईदीप हॉस्पिटल यांच्या सौजन्याने ७८ व्या स्वतंत्र दिनानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन गुरुवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत करण्यात आले आहे . या शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन मिळणार असून मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
यामध्ये ईसीजी, हिमोग्लोबिन, रक्तदाब, शुगर इत्यादीची मोफत तपासणी ही करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये डॉ. सतीश डेरे (मेंदू व मणक्याचे आजार, फिट, चक्कर तज्ञ), डॉ. श्रीकांत हांडे ( हृदयरोग मधुमेह, रक्तदाब, फुफुसाचे विकार), डॉ. प्रशांत पानसरे (स्त्री रोग तज्ञ, प्रसूती तज्ञ, पाळीचे आजार, वंध्यत्व समस्या), तसेच डॉ. संतोष रास्ते (जनरल फिजिशियन) हे तज्ञ डॉक्टर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी साईदीप हॉस्पिटल, निमगाव सावा ता.जुन्नर तसेच 9145297989 या नंबर वर संपर्क करावा. हॉस्पिटल च्या उपलब्ध सुविधा:- १) 24 तास अपत्कालीन अत्यावश्यक सेवा, २) विषबाधा, सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, फ्लू , डेंगू, मलेरिया, निमोनिया, कावीळ रोगावर उपचार, ३) अत्याधुनिक सुसज्ज आय.सी. यू व अद्यावत ऑपरेशन थिएटर, ४) डिलक्स रूम, प्रायव्हेट रूम, जनरल वॉर्ड आदी.५) सर्व विमा कंपनीचे कॅशलेस सुविधा उपलब्ध.