डॉ.कदम गुरुकुल इंदापूर या ठिकाणी तिसरी प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न 

1 min read

इंदापूर दि.१:- डॉ.कदम गुरुकुल चे अध्यक्ष डॉ. एल एस कदम आणि शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे भविष्य उज्वल घडावे व आदर्श पिढी निर्माण व्हावी या हेतूने वरील स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये डॉ. कदम गुरुकुल, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

ही स्पर्धा (दोन ग्रुप) मध्ये पार पडली. यामध्ये ग्रुप 1 (इ. पाचवी ते सातवी) ग्रुप 2 (आठवी ते दहावी) या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. शिवाजी चंद्रकांत देसाई -संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि अजीज इनाम मदारी- एमआयटी विश्वशांती गुरुकुल लोणी काळभोर यांनी निप:क्षपातीपणे परीक्षण केले.

आणि सर्व विजयी विद्यार्थ्यांचे डॉ. कदम गुरुकुल चे अध्यक्ष डॉ. एल एस कदम यांनी अभिनंदन केले. तर शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य रिशी बासू यांनी सर्व विजयी आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित केले.

यामध्ये ग्रुप – 1 मध्ये प्रथम- सतीश पिंटू पाटील – विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर , द्वितीय- रिद्धी रामचंद्र जगताप -अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, तृतीय- कृष्णराज रावसाहेब गुळवे डॉ. कदम गुरुकुल इंदापूर, तृतीय स्वरा वैभव कुलकर्णी – अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर ग्रुप – 2 मध्ये प्रथम- श्रावणी विजयकुमार जगताप -डॉ. कदम गुरुकुल इंदापूर,

द्वितीय- समीना रमजान तांबोळी- विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर तृतीय- श्रीलेखा संदेश देवकर डॉ.कदम गुरुकुल इंदापूर अतिशय अटीतटीच्या स्पर्धेतून वरील विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले. सर्वच स्पर्धकांनी खूप सुंदर विचार मांडले.आणि विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर या शाळेने आकर्षक आणि सुंदर असा फिरता चषक प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा मिळवून उपस्थितांची मने जिंकली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम कवितके डॉ. कदम गुरुकुल इंग्रजी विषय प्रमुख यांनी विशेष प्रयत्न केले. उत्कृष्ट सूत्रसंचालनही श्रीराम कवितके सरांनी केले. आभार ऋषी बासू सरांनी मानले .तर डॉ. कदम गुरुकुलचे स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आणि ही स्पर्धा यशस्वी झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे