तब्बल २५ वर्षानंतर दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
1 min read
हिवरे दि.३१:- दहावी सन १९९९-२००० च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दि. रोजी यशोधन ऍग्रो टुरिझम (ओसारा) हिवरे तर्फे नारायणगाव येथे पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,गणपती बाप्पा आणि आणे गावचे ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी महाराज यांच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाले. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी दांगट सर,डुंबरे सर, वाघमारे सर, दिवेकर सर आणि हांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते ते मुंबई, पुणे, आणे आणि इतर विभागातून आले होते. सर्व विद्यार्थ्यांचे गेटमधून येताना स्वागत पारंपारिक वाद्याने अगदी गाजत वाजत सनईच्या सुरात मुला मुलींचे औक्षण करत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन अगदी दोन महिन्यापासून सुरू होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे म्हणून हा कार्यक्रम उशिरा पण नियोजनबद्ध पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पंदारे आणि डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचा नियोजनामध्ये अजित आहेर.
संदीप पवार, बाजीराव पवार, एकनाथ गांडाळ, डॉ. अनुष्का शिंदे शितल शिंदे, राकेश पंदारे, संपदा हांडे, मेघा ढोले, गणेश साबळे आणि इतर विद्यार्थी होते कार्यक्रमांमध्ये शिक्षकीय भाषणे झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. या कार्यक्रमाकरिता यशोधन चे व्यवस्थापक राजश्री देशमुख आणि दीपक देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचा सर्वांनी अगदी मनसोक्त आनंद घेतला. यापुढे देखील अशा प्रकारे स्नेहसंमेलन करण्याकरिता सर्वांकडून सांगण्यात आले.