विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना दिले चांगला स्पर्श व वाईट स्पर्शचे धडे
1 min read
साकोरी दि.३१:- जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या इयत्ता पहिली ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रतिभा गाडगे यांनी विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श (Good touch) व वाईट स्पर्श (Bad touch) कसा ओळखायचा हे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. तसेच मुलांना परिचित व अपरिचित व्यक्ती भेटल्यानंतर कसे बोलावे कसे वागावे, वाईट स्पर्श जाणवल्यानंतर काय करावे याचेही मार्गदर्शन केले.समाजात घडणाऱ्या अनैतिक घटना, लहान मुलां -मुलींवर होणारे अत्याचार, त्यांची असुरक्षितता लक्षात घेऊन लहान विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या व वाईट स्पर्शाविषयी जागरूकता निर्माण व्हावी.
यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला छान प्रतिसाद दिला.यावेळी विद्यानिकेतन इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या मुख्याध्यापिका रूपाली पवार (भालेराव), तसेच संगीता औटी, हाडवळे अनिता, नूतन भोर, प्रवीण अहिरे, गणेश करडीले, विनोद उघडे, विशाल जाधव उपस्थित होते.