विद्यानिकेतन संकुलात दहीहंडी उत्सवात भक्तीमय व जल्लोषपूर्ण वातावरण
1 min read
साकोरी दि.२८:- साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल ॲकॅडमी व पी.एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ज्युनिअर केजी ते इयत्ता बारावी पर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. छान सजावट, सुंदर नटलेले बाळकृष्ण, राधा, गोपिका व गोविंदा यामुळे सर्व वातावरण भक्तीमय व जल्लोषपूर्ण झाले होते. यावेळी विद्यालयात प्रांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती. ह्या दहीहंडीचे पूजन विद्यानिकेतन च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) यांनी केले.
सर्वप्रथम लहान गोविंदांनी दहीहंडी फोडन्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या गोविंदांनी थर रचून सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थित दहीहंडी फोडली. यानंतर सर्वांना लाह्यांचा प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे शिक्षक घुले यांनी श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. याचे महत्व सांगितले. गाणी, नाच, उंच चढणार्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे, हे सांगितले.
दहीहंडी उत्सव साजरा करण्याची जन्माष्टमी व गोपाळकाला याबद्दल माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हा सांस्कृतिक सण असून तो विद्यार्थ्यांनी साजरा केला पाहिजे असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.
हा उत्सव साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक पी.एम साळवे तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल ॲकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) आणि पी.एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक रमेश शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा.
यासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या सुलभा डेरे, रोहिणी कदम ,अंजली चासकर, अनिता पाचपुते, माई काळदाते यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.