बेल्हे जिल्हा परिषद शाळेत दहीहंडीचे आयोजन; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला
1 min read
बेल्हे दि.२८:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक (ता.जुन्नर) शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गोपाळकाल्याचा आनंद लुटला. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी चैतन्य धनंजय संभेराव याने श्रीकृष्णाचा इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी हर्षदा कामडी या विद्यार्थिनीने राधा चा वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. शाळेतील सर्व मुली यावेळी गोपिकांचा पेहराव परिधान करून यामध्ये सहभागी झाल्या.
गोविंदाच्या गीतांवर शाळेतील मुलांनी ठेका धरत छान नृत्य करत गोपाळकाल्याचा आनंद लुटला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडत सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद दिला.दहीहंडी उत्सवासाठी शाळेतील शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाभाऊ मुलमुले, पालक तुकाराम भंडलकर, गोरक्षनाथ शिरतर, गौरी संभेराव इत्यादी पालकांचे यासाठी सहकार्य लाभले
याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया बांगर यांनी छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले.