विद्यानिकेतनच्या रोशनी सोनवणेची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड
1 min read
साकोरी दि.२:- विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज साकोरी (ता.जुन्नर) मध्ये शिकणारी विद्यार्थिनी रोशनी रविंद्रकुमार सोनवणे हिची राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे. रोशनी हि सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिने बारावी विज्ञान शाखेत ७९% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच NEET परीक्षेत ७२० पैकी ५९३ मार्क पाडून घवघवीत यश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल विद्यानिकेतन संकुलाचे अध्यक्ष पी. एम साळवे यांनी अभिनंदन केले तसेच विद्यानिकेतन ज्यू. कॉलेज चे प्राचार्य आर. बी. शेवाळे यांनी तसेच रोशनीला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांनी रोशनीचे विशेष अभिनंदन केले.