छत्रपती शिवाजी महाराजांचा शक्तीशाली पुतळा पुन्हा उभा करा:- पांडुरंग पवार
1 min read
जुन्नर दि.३०:- सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभी करण्याची मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष. व पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला.
हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणण्णरे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही.
या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यातअशा घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात गुरुवार दि.२९ ऑग्स्ट २०२४ रोजी सकाळी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळयासमोर मुक आंदोलन करण्यात येणार आहे.
या पत्रादवारे आपणांस या घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकरणात जे, जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुदध अत्यंत कठोर करवाई करण्यात यावी. याची मागणी निवेदनादवारे करण्यात येणार आहे.