कै. धोंडीभाऊ पिंगट माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, एक अभ्यासू, दमदार व हरहुन्नरी नेतृत्व हरपले:- खासदार डॉ.अमोल कोल्हे

1 min read

बेल्हे दि.३०:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुळूंचवाडी (बेल्हे) येथे झालेल्या एका अंत्यविधी वरून परत येत असताना झालेल्या अपघातात बेल्हे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व बेल्हे गावचे माजी उपसरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक धोंडीभाऊ पिंगट यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शिरूर मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पिंगट यांच्या निवासस्थानी बुधवार दि.२८ रोजी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की, जुन्नरच्या पूर्व भागातील कै. धोंडिभाऊ पिंगट एक ज्येष्ठ नेतेच नव्हे तर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले असून तालुक्यातील एक अभ्यासू, दमदार व हरहुन्नरी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांची उणीव सतत भासणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शिवसेना उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात.

जालिंदर पानसरे,वरुण भुजबळ,संजय गुंजाळ अशोक सोनवणे,बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले, राहुल कुंजीर, रामदास औटी, राहुल केदारी, सुनील भालेराव, प्रदीप पिंगट व पिंगट परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे