ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलची यशस्वी घोडदौड; तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ मेडल
1 min read
शिरूर दि.३०:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिरूर तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या (ता.शिरूर) विद्यार्थ्यांनी उतूंग कामगिरी केली. यामध्ये शौनक देशपांडे सिल्वर मेडल, आदेश घेगड सिल्वर मेडल, धून पटेल ब्रांज मेडल, सोम्या सिंग ब्राँझ मेडल, श्रेयस पांडे यांस ब्राँझ मेडल मिळाले.
त्याचप्रमाणे यापूर्वी बुद्धिबळ स्पर्धेत दोन विजयी तर योगासन स्पर्धेत तब्बल सात विद्यार्थ्यांना मेडल मिळाले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. राजेराम घावटे (अध्यक्ष, गंगा एज्युकेशन सोसायटी), दिपक घावटे (उपाध्यक्ष, गंगा एज्युकेशन सोसायटी), सुधिर शिंदे (खजिनदार, गंगा एज्यु. सोसायटी). सविता घावटे ( सचिव, गंगा एज्यु. सोसायटी), प्रसाद घावटे (संचालक, गंगा एज्युकेशन सोसायटी), अमृतेश्वरी घावटे (संचालिका गंगा एज्युकेशन सोसायटी),डॉ.नितीन घावटे (सी.ई.ओ. गंगा एज्यु. सोसायटी) आदि सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या शोभा अनाप, सह शालेय क्रीडा विभाग संदीप व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही सर्वांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.