व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन दिवस रंगणार तालुका स्तरीय खोखो च्या स्पर्धा
1 min read
वडगाव कांदळी दि.३:- व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुका स्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 4 सप्टेंबर व गुरुवार दि.5 सप्टेंबर 2024 रोजी व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा, परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी,
कांदळी, यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 (वयोगट 14/ 17/19 मुले-मुली) आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता तालुक्याचे माजी आमदार जुन्नर शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सर्व विश्वस्त, सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे तसेच क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व पराग छिल्लारे यांनी खेळाचे चोख नियोजन केले आहे.