जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी मॉडर्न च्या ९ विद्यार्थ्यांची निवड
1 min read
बेल्हे दि.२९:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने जुन्नर तालुकास्तरीय योगासना स्पर्धा समर्थ गुरुकुल बेल्हे येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून ९ विद्यार्थांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे.
वयोगट १४/ १७ वर्ष मुले/ यांनी या योगासना स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यामध्ये 14 वर्षे वयोगट प्रथम क्रमांक नयन भास्कर कुरकुटे, कुणाल महेश माथेरा, मनवित भगु उराडे व १७ वर्षे वयोगट मुले /मुली प्रथम क्रमांक रोहन किरण भोईर, जय रामदास भोईर, नितेश रमेश खुलत, चेतन जगदीश सापटा, विपुल सुभाष घुगे, तृप्ती गोविंद लिलका यांनी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
शाळेचे क्रीडा शिक्षक महेंद्र गुळवे, योगेश शिंदे व विशाल गुजर यांचा मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सी.ए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीइओ शैलेश ढवले, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या गाडगे व सर्व शिक्षक यांनी केले. तसेच शाळेत क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
या वेळी तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत उतुंग यश मिळवणाऱ्या व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे व उपप्राचार्य के पी.सिंग यांनी केला.