बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा
1 min read
सावरगाव दि.२८:- जुन्नर तालुक्यातील पाबळवाडी (पो. सावरगाव) येथील प्रफुल्ल रसाळ यांच्या रोलर जातीच्या कुत्रीचा बिबट्याने मंगळवार दि.२७ रोजी रात्री फडशा पाडला.या कुत्र्याची पिल्ले पंचक्रोशीत अनेक ठिकाणी विकली जातात. त्यामुळे या शेतकऱ्याचे हे उत्पन्नाचे साधन होते तसेच रात्री अपरात्री म्हातारी माणसे बाहेर आल्यास या कुत्रीमुळे त्यांना आधार मिळत होता. डोंगरा शेजारीच घर असल्यामुळे ही भीती त्यांची त्या कुत्र्याच्या आधारे जात होती. मात्र आता पाबळवाडीत एकही कुत्रे शिल्लक राहिले नाही.
या कुत्रीच्या जाण्याने घरातील सर्व माणसे रडत होती यावरून आपल्याला अंदाज येईल की फक्त ते प्राणी नसून तो एक जीव होता आणि वनात राहणारा बिबट्या अजून किती जणांचा जीव घेणार आहे हाच प्रश्न येथील पंचक्रोशीतील सर्व लोक विचारत आहेत. घटनास्थळी अशोक पाबळे,अक्षय हिंगे, यांनी ही माहिती दिली.