पुणे – नाशिक औद्योगिक दुतगर्ती मार्ग होऊ देणार नाही; जुन्नरचे शेतकरी आक्रमक

1 min read

राजुरी दि.२८:- पुणे – नाशिक औद्योगिक दुतगर्ती मार्ग क्र.११ कायमस्वरूपी रद्द करावा आणि रद्द केल्याप्रकरणी अधिसुचना राज्यसरकारने त्वरीत काढावी, महामार्ग प्रकल्पांना भुसंपादन कायदा १९५५ चा लावण्याऐवजी केंदाचा भुसंपादणाचा सन २०२३ चासंपुर्ण कायदा लावण्यात यावातसेच या तरदुतीनुसार सूपीक, बागायती जमिनित प्रकल्प आखता येत नसताना. आखलेला प्रस्ताविक महामार्ग रद्द करावा, अनेक गावांतील जमिनी बागायती असुन सुध्दा सात बारा उता-यावर जिरायती शेरा वगळुन तो बागायती शेरा करून द्यावा अश्या मागण्यांसाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी, कोळवाडी, गुंजाळवाडी, तांबेवाडी, जाधववाडी, निमगाव सावा. औरंगपूर आदी गावातील महामार्गातील बाधित शेतकरी साखळी उपोषणास मंगळवार दि. २७ ऑगस्ट पासून राजुरी येथील संभाजी चौकात सकाळी ९ वाजल्यापासुन बसले असुन या जाणा-या महामार्गास शेतक-यांनी विरोध केला आहे या उपोषणस्थळी प्रसंगी भाजपा नेत्या आशा बुचके, माजी सभापती दिपक औटी,

ग्राहक पंचायतीचे प्रांतसंघटनमंत्री बाळासाहेब औटी, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक वल्लभ शेळके, कोळवाडी गावचे उपसरपंच दिनेश सहाने, एम.डी.घगाळे, जि.के.औटी, लक्ष्मण घंगाळे, दिलीप जाधव, संजय कणसे, कारभारी औटी , प्रतिक जावळे.

गणपत गाडगे, दत्तात्रय हाडवळे, गोरक्ष हाडवळे, रवि हाडवळे, गोविंद हाडवळे, अविनाश हाडवळे, संजय औटी, मोहन नायकवडी आदी शेतकरी उपस्थित होते माजी सभापती औटी म्हणाले या ठिकाणाहुन जात असलेल्या महामार्गासाठी ज्या जमीनी जात आहे त्या साठी कितीही रक्कम शासणाने दिली तरी आम्ही आमच्या जमीनी देणार नाही असा प्रखर विरोध यावेळी केला आहे.

याप्रसंगी वल्लभ शेळके म्हणाले की तालुक्यातील गावातील शेतकरी अल्पभुधारक असुन येथील शेतक-यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे.तसेच यापुर्वीही या परीसरातुन राष्टीय महामार्ग ०६१ हा,तसेच ,कुकडी पाटबंधारे विभागाचा डावा कालवा तर पिंपळगाव जोगे धरणाचा डावा कालवा. तसेच या कालव्यांच्या पोट चा-यांमध्ये अनेक शेतक-यांच्या जमीनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.तसेच येथील शेतक-यांचा मुख्य व्यवसाय शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घेतला जात असल्याने शेती हे उपजिवीकेचे साधन बनलेले आहे त्यातच याच परीसरातुन कल्याण-लातुर हा महामार्ग देखील याच ठिकाणाहुन जात. असल्याने त्याचाही सर्व्हे करण्याचे काम चालु आहे त्यामुळे येथील शेतक-यांनी जगायचे कसे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहीला आहे त्यामुळे या महामार्गास विरोध आहे.दरम्यान या साखळी उपोषणाला भाजपा नेत्या आशा बुचके यांनी भेट देत बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे बागायती सुपीक जमीन गेलेले आहे ते क्षेत्र वगळले जाईल . तसेच ज्यांचे क्षेत्र बागायती आहे मात्र सदर उताऱ्यावर जिरायती शेरा म्हणून उल्लेख आहे तो तात्काळ संबंधित खात्याला सांगून आपण कमी करून घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

ग्राहकपंचायत पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करा व त्याची अधिसूचना त्वरित राज्य सरकारने काढावी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा मार्ग रद्द करावा. फक्त ठराविक शेतकरी बाधित होत नाही तर पूर्ण गावे उद्ध्वस्त होत आहेत. पूना नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना समांतर अन्य रस्ते असताना या औद्योगिक महामार्गाचा घाट कशासाठी घातला जात आहे. औद्योगिक महामार्ग सुपिक व बागायती जमिनीतून जात आहे हजारो एकर बागायती जमिनीचे संपादन होणार आहे.

याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. सरकारने वेळेत दखल घेतली नाही तर साखळी उपोषणाचे रूपांतर प्राणांतिक उपोषणात करण्यात येणार असल्याने याची सरकारने नोंद घ्यावी.’

बाळासाहेब औटी, प्रांत संघटन मंत्री

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे