धोलवड ग्रामविकास ट्रस्टच्या अध्यक्षपदी ॲड.कुलदीप नलावडे तर सचिवपदी योगेश नलावडे यांची निवड
1 min read
धोलवड दि.२६:- जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव असणाऱ्या धोलवड ग्रामविकास ट्रस्टची पंचवार्षिक अध्यक्ष पदाची निवडणूक अटीतटीसह खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदर अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत 18 सदस्यांपैकी अध्यक्ष पदासाठी ॲड.कुलदीप नलावडे व बाळासाहेब मुंढे यांनी अर्ज दाखल केला. यात गुप्त मतदान पद्धतीने चिठ्ठीद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये 18 पैकी 10 मते अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड.कुलदीप नलावडे यांना पडली तर बाळासाहेब मुंढे यांना 8 मते पडली. त्यामुळे बहुमताने अध्यक्षपदी ॲड.कुलदीप शरद नलावडे यांची निवड झाल्याचे माजी अध्यक्ष अशोक मुंढे व सचिव दत्तात्रय भागवत यांनी जाहीर केले.
तर यावेळी नवनियुक्त अध्यक्ष ॲड.कुलदीप नलावडे यांनी सचिवपदी सर्वानुमते योगेश ज्ञानेश्वर नलावडे यांची निवड जाहीर केली.या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच नवनियुक्त अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेल्या भाऊबंद मंडळी सभासदांची मीटिंग घेऊन पुढील पदाधिकारी निवड करण्याचे सर्वानुमते ठरले. यानिमित्ताने धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष अशोक मुंढे, सचिव दत्तात्रय भागवत, यांसह नवनियुक्त अध्यक्ष ॲड.कुलदीप नलावडे.
सचिव योगेश नलावडे, यांसह गावातील भाऊबंद मंडळीतून ट्रस्टवर नियुक्त झालेले सदस्य राहुल नलावडे, अजित नलावडे, विनायक नलावडे, शिवाजी नलावडे, अजित नलावडे, प्रदीप नलावडे, प्रवीण नलावडे, सुनील नलावडे, बाळासाहेब मुंढे, सुभाष मुंढे, गणेश नलावडे, मच्छिंद्र दिघे, आशिष कालेकर, संदीप भोर.
प्रज्वल भालेराव, अक्षय लवांडे यांसह ग्रामस्थ सतीश नलावडे, रमेश पाटील नलावडे, पत्रकार अशफाक पटेल, राजू लांडगे, अमोल नलावडे, सचिन मुंढे, संदीप मुंढे, प्रकाश नलावडे, विकास नलावडे, पंकज नलावडे, मंगेश नलावडे, अजय नलावडे, स्वप्निल लांडगे, संदीप लवांडे, सतीश लवांडे, गणेश दिघे, तेजस नलावडे, गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.