जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ- आळेकर इच्छुक; उध्दव ठाकरे,संजय राऊत यांची घेतली भेट
1 min readजुन्नर दि.२४:- विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यभरात पक्ष बांधणी करिता आणि योग्य उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून चालू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्नर मतदार संघावर विलास वाव्हळ आळेकर (रा.आळे) यांनी दावा केला आहे. पक्ष फुटी नंतर विलास वाव्हळ पक्ष बांधणी करिता अहोरात्र मेहनत घेतल्याचे बोलले जाते. तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून विलास वाव्हळ यांना पाहिले जाते. नुकतीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली.
विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. तसेच जुन्नरकरांच्या प्रश्न बाबत सदैव अग्रस्थानी असतात. बहुतांश जुन्नरकरांचे तसेच तेली समाजाची विलास वाव्हळ यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडी कडून संधी मिळावी. अशी मनोभावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील तेली समाजाचा महत्त्वाचा चेहरा विलास वाव्हळ आळेकर मागील ३५ वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष संघटक आणि पक्ष कार्यकारी सदस्य, बृहन महाराष्ट्र तेली समाज, संताजी तेली क्रांती मोर्चा चे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहे. शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदावर असताना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे. तसेच महाराष्ट्र सह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात २८ विधानसभा मतदारसंघ असून. सर्व मतदारसंघांमध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वाव्हळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नर सह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. त्यामुळे विलास वाव्हळ यांना महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून संधी मिळाली तर अजित पवार गटाचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्यासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.