आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते आणे पठारावर दीड कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
1 min read
आणे दि.२४:- जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शन तसेच लोकनियुक्त सरपंच आणे प्रियांका प्रशांत दाते यांच्या पाठपुराव्यातुन आणे (ता.जुन्नर) या ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आणे ते संभेराव वस्ती रस्ता ३० लक्ष रुपये, आणे ते आनंदवाडी रस्ता २० लक्ष, आणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वर्ग १ खोली बांधणे १२ लक्ष पन्नास हजार रुपये, आणे येथील श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण १० लक्ष, आणे येथील रा.मा. ६१ ते गोडेशेत रस्ता १० लक्ष, आणे येथील रा.मा. ६१ ते दाते मळा रस्ता १० लक्ष,
आणे येथील हनुमानदरी रस्ता १० लक्ष, आणे येथे सोलर हायमास्ट दिवा बसविणे १० लक्ष, आणे येथील लोहरमळा ते हनुमानदरी रस्ता १० लक्ष, आणे येथील गोडेशेत जोड रस्ता करणे १० लक्ष, आणे येथील रा.मा. ६१ ते आहेर वस्ती गोडेशेत रस्ता करणे १० लक्ष, आणे येथील अरुण आहेर रस्ता करणे ५ लक्ष,
मौजे आणे धनंजय दाते रस्ता करणे ५ लक्ष, माळवाडी आणे येथील येमाईमाता सुशोभीकरण करणे ४ लक्ष, असे एकूण १ कोटी ५६.५ लक्ष रुपये रक्कमेची उदघाटने याप्रसंगी करण्यात आली.
यावेळी तालुका आमदार अतुल बेनके यांनी जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्या देखील सोडवल्या व काही समस्यांचे निराकरण तात्काळ केले. या वेळी आणे गावच्या सरपंच प्रियांका प्रशांत दाते, मधुकर दाते अध्यक्ष श्रीरंगदास स्वामी देवस्थान संस्था, बाळासाहेब दाते, अतुल भांबेरे,
उपसरपंच सुहास आहेर, माऊली संभेराव, पुष्पलता आहेर, ज्योती आहेर, संजय डोंगरे, सुनीता दाते, बाळासाहेब आहेर, जयराम दाते, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, ऍड. संतोष आहेर, बाळासाहेब दाते, अशोक दाते व उद्घाटन ठिकाणचे अनेक मान्यवर उपस्थित होते.