माजी आमदार शरद सोनवणे यांच्या पाठपुराव्यातून जुन्नर च्या पूर्व भागाला २ कोटी निधी मंजूर

1 min read

आळेफाटा दि.२४:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून २ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती उंच खडक राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे यांनी दिली. या मध्ये खलील ठिकाणी प्रत्येकी १० लाख रुपये निधी मिळाला आहे. यामध्ये उंचखडक कोळखांड वनक्षेत्रातील रस्ता दुरुस्ती करणे, उंचखडक स्मशानभूमी रस्ता करणे, उंचखडक गावठाण ते भिमाजी सखाराम कणसे यांचे घर रस्ता करणे, राजुरी शिंदेमळा उर्वरित रस्ता मजबुतीकरण करणे. राजुरी गोगडीमळा रस्ता मजबुतीकरण करणे, राजुरी येमाई मंदिर ते दुर्गामाता नगर रस्ता मजबुतीकरण करणे, पेमदरा एनएच ६१ बुवा महाराज मंदिर रस्ता तयार करणे, पेमदरा भोसलेवाडी ते लवणवस्ती रस्ता तयार करणे, पेमदरा एनएच ६१ ते स्मशानभूमी रस्ता तयार करणे. कोंबरवाडी (बेल्हे केनोल ते स्मशानभूमी रस्ता तयार करणे), कोंबरवाडी (बेल्हे) अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, राजुरी लळई त्रिंबकमळा रस्ता दुरुस्ती करणे, तांबेवाडी ते स्मशानभूमी रस्ता करणे,तांबेवाडी तांबेवस्ती ते स्मशानभूमी रस्ता तयार करणे, तांबेवाडी ते भोरवस्ती रस्ता तयार करणे. कोळवाडी मारुती मंदिर ते दिघेवस्ती रस्ता तयार करणे, कोळवाडी गावठाण अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, आणे एनएच ६१ गोडेशेत रस्ता तयार करणे,आणे एनएच ६१ तरळदरा रस्ता तयार करणे, आणे माळवाडी ते डोंगरवस्ती रस्ता तयार करणे आदी. असा ऐकून २ कोटी रुपये निधी मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे