संजय नलावडे यांचा स्तुत्य उपक्रम; शिवनेरीची श्रीमंती’ जुन्नरकर विद्यार्थ्यांसाठी गावोगावी पोहचविली

1 min read

जुन्नर दि.२७:- संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक प्रत्येक जुन्नरकरांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी वाचावे या भावनेतून वडगाव कांदळी येथील ज्येष्ठ समाजसेवक शिवाजीराव निलख यांजकडून जुन्नर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालय.दे महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या सुस्थितीत सुरू असलेल्या वाचनालयांना ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या विद्यार्थी. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या गुणगौरव सोहळ्यात आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते आणि बाळासाहेब खिल्लारी, दिपक औटी यांच्या उपस्थितीत प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाची एक प्रत देऊन सदर उपक्रमाचा शुभारंभ दि. २२ ऑगस्ट रोजी विद्या विकास मंदिर, राजुरी येथे करण्यात आला. जुन्नर तालुक्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेले आणि विविध क्षेत्रातील गुणिजणांचा संघर्षमय जीवनप्रवास मांडलेले ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे प्रेरणादायी पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातात गेले पाहिजे’ असे संमिश्र उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक सतीश सोळंकूरकर आणि शिवनेरीभूषण डॉ. सदानंद राऊत यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी काढले होते. हाच धागा पकडून जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातील स्तंभलेखक संजय नलावडे यांनी साकारलेल्या महान व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी जुन्नरच्या वडगाव कांदळी येथील ज्येष्ठ समाजसेवक शिवाजीराव निलख यांनी सर्व विद्यालय, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या वाचनालयांना ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तक भेट देण्याचा संकल्प केला होता. यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघाचे टी. बी. वाघदरे, अशोक काकडे, पंकज घोलप, विकास दांगट, संयोजक जी. के औटी, राजेश दांगट आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.वडगांव कांदळीचे जेष्ठ समाजसेवक शिवाजीराव निलख यांच्या कडून जुन्नर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालय. महाविद्यालय आणि तालुक्यातील सुस्थितीत असलेली वाचनालयांना सन्माननीय स्तंभ लेखक संजयजी नलावडे यांनी अत्यंत मेहनत घेऊन आपल्या जुन्नर तालुक्यातील कर्तृत्ववान अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव शिवनेरीची श्रीमंती या ग्रंथातुन आपल्या समोर मांडला आहे. आपणा सर्वांना अभिमान वाटतो.असा कर्तृत्वाचा प्रेरणादायी ईतिहास भावी पिढ्यांना मिळावा व त्यातून प्रेरणा घ्यावी म्हणून हे ग्रंथ वितरीत करण्याचा मनोदय केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे