राजुरीचा विद्या विकास मंदिर ची क्रिकेट टिमच्या ड्रेससाठी पंकज कणसे यांचं सौजन्य
1 min read
राजुरी दि.२३:- फुलगाव (पुणे) येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी विद्या विकास मंदिर राजुरी (ता.जुन्नर) येथे सिजन बॉल क्रिकेट टिम उतरत आहे. या विद्यार्थांचा शाळेतील शिक्षक संतोष गोपाळे, प्रकाश जोंधळे, मंगेश डुंबरे यांनी या खेळाडूंचा सराव घेतला आहे. या खेळाडूंच्या संपूर्ण टिमसाठी ड्रेसला खर्च राजुरी उंचखडक गावचे युवा उद्योजक पंकज कणसे यांनी केला असून या टिमला शुभेच्छा दिल्या आहेत. तर विद्यालयाचे प्राचार्य जी.के.औटी यांनी पंकज कणसे यांचे आभार मानले.