संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था व अन्नसंकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
1 min readजुन्नर दि. २१:- संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था व अन्नसंकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीराम मंगल कार्यालय, राजुरी, तालुका जुन्नर येथे भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जुन्नर, खेड, आंबेगाव, पारनेर, संगमनेर तसेच इतर तालुक्यातील बुद्धिबळ खेळाडूंनी गुगल फॉर्म भरून सहभागी होण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे.या स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील व खुला गट असे दोन गट असणार आहेत. दोन्ही गटांमधील विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
संकल्पचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांनी सर्व बुद्धिबळप्रेमी, युवक, व खेळाडूंना आवाहन केले आहे की त्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला खेळ दाखवावा व स्पर्धेला यशस्वी करावे. ही स्पर्धा आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करण्याची व खेळात प्रावीण्य सिद्ध करण्याची अनोखी संधी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा: मच्छिंद्र पाटे ९८६०२०४७९७, प्रा. एच पी नरसुडे ९८६०२०३८७९, जीलानी पटेल ९९६०३०६३६०