बालक मंदिरच्या विद्यार्थिनींची एक राखी सैनिकांसाठी

1 min read

नारायणगाव दि.२१:- वारूळवाडी येथून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची व सणांची ओळख व्हावी तसेच आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत विविध सण सादर केले जातात. त्यातीलच एक पवित्र सण व बहिण भावाचे अतूट नाते असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी बालक विद्या मंदिर मध्ये हा सण अतिशय मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. परंतु रक्षाबंधन हे आता बहीण -भावा पुरते मर्यादित न राहता रक्षण करत्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशी ही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशावेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत आपली राखी पोहोचणे गरजेचे असते. म्हणूनच यावर्षी बालक विद्या मंदिर मध्ये एक अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाज रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असणारे सैनिक पोलीस बांधव सतत देशाच्या सेवेसाठी कार्यरत असल्यामुळे त्यांना कुठले सणवार साजरे करता येत नाही, म्हणूनच रक्षा बंधन निमित्त माझी राखी सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक व पोलीस बांधव तसेच सुभेदार मेजर लेफ्टनंट उमेश पांडुरंग अवचट, पंढरीनाथ घोटकर,किसनराव ढवळे,संतोष घोडके, धोंडीभाऊ थोरात,गंगाधर ढोले,शरद बेळे,संभाजी वाळुंज,एकनाथ वाजगे, दशरथ डोंगरे.भगवान काळे साहेब, वनरक्षक माजी सैनिक ज्ञानेश्वर पवार ,पोलीस कॉन्स्टेबल मंगेश लोखंडे, नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ ,आदित्य ढेरे व सर्व रेस्क्यू टीम सदस्य, तसेच शाळा समितीचे सर्व सदस्य, मोनिका मेहेर, देविदास भुजबळ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल हांडे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुशांत भुजबळ. चेअरमन डॉ.आनंद. कुलकर्णी  बालकमंदिर चे चेअरमन अरविंद भाऊ मेहेर, कृषिरत्न कृषी भूषण अनिल तात्या मेहेर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे, उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे उपस्थित होते. यानंतर आजी-माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल तसेच स्वतःचे व देशाचे रक्षण कसे करावे. याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केले. यानंतर मुलींनी त्यांच्या चिमुकल्या हातांनी स्वतः बनवलेली राखी सैनिकांच्या हातावर बांधली व मुलींचे तोंड गोड करण्यासाठी मुलींना सैनिकांकडून खाऊ देण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे