विद्यानिकेतन मध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी

1 min read

राजुरी दि.१८:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व पी.एम हायस्कूल साकोरी (ता.जुन्नर) येथे विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या हातावर राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता नववी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या विद्यार्थ्यांच्या हातावर बांधून औक्षण केल्याने मुलांमधील मैत्री, बंधुभाव या नात्यांची वीण अधिक घट्ट झाल्याचे प्राचार्या रूपाली पवार (भालेराव) यांनी स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला चालना मिळावी यासाठी राखी बनविणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी मणी, विविध काचा, कापूस इ वस्तूंपासून अतिशय सुंदर राख्या बनविल्या होत्या.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता औटी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे