बेल्ह्यात विद्यार्थांचे सामूहिक रक्षाबंधन
1 min readबेल्हे दि.१७:- जुन्नर तालुक्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे या शाळेत सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील सर्व विदयार्थांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
शाळेच्या कला शिक्षकांनी मुलांना विविध वस्तुंच्या वापरातुन सुंदर कलात्मक राख्या कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण देऊन मुलांनकडून राख्या बनून घेतल्या. शाळेतील सर्व मुलींनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या वस्तुंचा वापर करून स्वतः बनविलेल्या व सध्या राख्या मुलांना बांधल्या.
राखी बांधल्यावर मुलांनी मुलींसाठी देण्यासाठी पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, स्वीट, अशा विविध भेटवस्तू दिल्या. नववीच्या विद्यार्थिनी आर्या गुंजाळ व श्रेया सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरी जाधव व शर्वरी भांबेरे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
व सर्वांना रक्षा बांधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे व सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.