व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘रायफल शुटिंग ट्रेनिंग’ चे उद्घाटन
1 min readनगदवाडी दि.१६:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित ‘व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘रायफल शुटिंग ट्रेनिंग’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे ज्येष्ठ सभासद पाराजी कृष्णाजी बोरचटे तसेच माजी- सुभेदार मेजर उमेश पांडुरंग अवचट. व शिवाजीराव रामचंद्र पाटे माजी- वॉरंट ऑफिसर या प्रमुख पाहुण्यांसह विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे, पालक-शिक्षक संघाचे सदस्य. पालक वर्ग, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे सर्व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत हे अनावरण पार पडले.’नेमबाजी’ हा वैयक्तिक कौशल्याचा भाग असला तरी नेमबाजी च्या सांघिक स्पर्धा ही घेण्यात येतात. या उद्देशानेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कला-कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळावी. यासाठी शाळेने सुरू केलेला उपक्रम नक्कीच सुत्य आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या उपक्रमासाठी शाळेचे अभिनंदन व शुभेच्छा! या उपक्रमाच्या प्रारंभासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.